Saturday 23 February 2013


सरकारचा हेतू उदात्त आहे....

सरकारचा हेतू उदात्त आहे,
अण्णांच्या सहवासाने 
राजा, कलमाडी, कनिमोळी सुधारतील
अशी सरकारला आशा आहे….

अण्णांच भाग्यं थोरच म्हणायचं,
अशा सज्जनांचा सहवास मागून मिळत नाही,
पण शक्यं झालं
कारण सरकारचा हेतू उदात्त आहे

अण्णा जमलं तर बघा, शेजारी हुशार लोक आहेत
त्यांना विचारा एकदा,
एक दिवस पैसे न खाण्याचं
उपोषण जमेल का
पण नकोच, त्यांना ते जमणार नाही
कारण सरकारचा हेतू उदात्त आहे

एवढा छी थू झालेला पंतप्रधान आम्ही पाहीला नाही
अण्णा, कसला मोह पडतो हो एवढा?
लाज वाटते अण्णा, नपुंसकतेची
पण काळजी करु नका,
आम्हांला सवय आहे, असच जगण्याची

अण्णा, हया सगळ्यांमधे तुम्ही एकटेच
मर्द आहात, पण चित्रं आशादायक आहे
कारण तुमचा हेतू उदात्त आहे

--जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment