Saturday 23 February 2013

अंधार कधीचा पडला....


अंधार कधीचा पडला....

अंधार मिट्ट पडला
सावली भवती नाही
हा मार्ग कसा मिळावा
ताराही वरती नाही

मायेचा विळखा आता
बांधून ठेवत नाही
गर्दी भरपूर आहे 
पण एक आप्त नाही


प्रत्येक द्वंद्व हरलो
काहीही शिकलो नाही
जगणे संपत आले
तरीही जगलो नाही

पथ सारा चढणीचा
मनात ताकद नाही
अहं मात्रं जपलेला 
जराही वाकत नाही 

जगण्याची भीती, तरी
मरणाची ओढ नाही
संपली उत्तरे सारी 
कोड्याची उकल नाही 

--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment