Saturday 23 February 2013

पुरुष.....


पुरुष.....

आनंदाच्या त्या परमोच्च क्षणी
तू माझ्या मिठीत असतेस हे खरं
पण डोळ्यापुढचा चेहरा आणि
डोक्यातली मापं मात्रं वेगळी असतात
हा मानसिक व्याभिचार आता रोजचा....

मी राम असो नसो,
तू मात्रं सीतेसारखीच हवीस
तसं आपलं न बोलता ठरलंय
माझाच चेहरा असतो ना तुझ्यासमोर
की तुझंही माझ्यासारखंच?
हा प्रश्न पडला कि माझा गोंधळ उडतो
पण मी पुरुष आहे शेवटी
तसं काही कळलं तर, काही खरं नाही 
म्हणजे तुझं काही खरं नाही....

शंकेची पाल चुकचुकते, बोलताही येत नाही
म्हणून मग मी सूड म्हणून सुख ओरबाडतो
लाज वाटून असेल, नेमकं सांगता येत नाही
म्हणून मग तुझ्याकडे पाठ फिरवून झोपतो ....

--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment