Saturday 23 February 2013

नरक.....


नरक.....

(संदर्भ : व.पु.काळे - 'एकाला सतत इच्छा होणं आणि दुस-याला अजिबात न होणं म्हणजे नरक' - पार्टनर)

आम्हाला इच्छा नाही झाली की तुम्ही चिडचिड करता,
टोमणे मारता, कुचकट बोलता, आदळआपट करता 
वेळ प्रसंगी हात उचलण्याची पण तयारी ठेवता

या एका गोष्टीचं भांडवल करून बाहेर 'सोय' करायला
तुम्हाला काही चूक वाटत नाही
कारण ते तुम्हाला शक्य असतं म्हणून?

पण हेच उलट झालं तर?

आम्ही तुम्हाला समजून घ्यायचं असतं
ते सुद्धा तारेवरची कसरत करत
तुमचा इगो न दुखावता , तुम्हाला राग न येता
आमच्यावर पतीव्रतेपणाची जबाबदारी असते ना
मुलांना नाव तुमचं असलं तरी जबाबदारी आमची
संसार सांभाळण्याची, संस्कारांची

पण तरीही तुम्ही चिडचिड, आदळआपट करताच, का?
राग काढायला हक्काची व्यक्ती आहे म्हणून?
की पाय घसरला नाही म्हणून?
कारण ते कारण मिळत नाही ना भांडायला, म्हणून?

तुम्ही नरक करता आयुष्याचा कारण आपण वरचढ
हे शक्य नसलं तरी ते मान्य होत नाही म्हणून

--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment