Saturday 23 February 2013


मधुमोह......

ती खडीसाखरेसारखी गोड आहे
मी तर तिला मधुमेहच् म्हणतो...

ती परवा कानात बोललीमाझच् चुकलं,काय काय करतमी मुद्दाम दोनदा ऐकलं
तिचे ओठ म्हणजे मधाची पोळीच की… 
सकाळी उठून बघतो तर कानाला मुंग्या !!! 
आता काय काय जपणारमुळात तिचं सारं कामच अवघड आहे
बोलते तर इतकी गोडऐकत रहावंमधेच आपण एकटेच् बोलतोय
हे लक्षात आलं कीलाजते,
बरं ते तरी साधंसुधंनाहीती अमर्याद लाजते… 
मग तर ती अजूनच् गोड दिसतेवाढली परत शुगर  ...

हे झालं बोलण्याचंदिसण्याचं?
ती संगमरवरी आहेआरशासारखी नितळ
बरं समोर बसली तर शांत बसणार नाही
निमुळत्या बोटांनी लांबसडक केसांशी खेळ चालू
शेपटा सारखा पुढे घ्यायचामागे टाकायचा… 
हयांचा खेळ होतोजीव आमचा जातो
तरी मी तिला वाऱ्यावर नाही बसवत -   
काबटांना सारखी मागे सारते
गोरेपान हात बघू की बटांआडचा चंद्र बघू
केसानं गळा कापते हो.… 
परवा तिला भेटून परत येताना चेक करून आलो
डॉक्टर म्हणाले - बी. पी. वाढलय…  
शुगर पण चेक करून घ्या… 
काळजी घ्याकशामुळे होतं हे असं वरचेवर?
मी तिचा फोटो दाखवला… 

म्हणाले उगाच औषधांवर पैसे खर्च करू नका
हा आजार बरा होण्यातला दिसत नाही!!! 
तात्पर्यफार विचार केला काय न केला काय,
व्हायचं तेच होणारमी रोजच मधुमेही होणार… 

-- जयंत विद्वांस






No comments:

Post a Comment