Sunday 24 February 2013

रावसाहेब....


रावसाहेब....
 (एडविन रॉबिन्सन् यांच्या ‘रिचर्ड कोरी’ या कवितेचा स्वैरानुवाद)

रावसाहेब मोठ्या झोकात संध्याकाळी गावात यायचे
आम्ही फूटपाथवरून अनिमिष नजरेनी त्यांना पहायचो
नखाशिखांत सभ्यं माणूस आणि जाणवणारं
लोभसवाणं राजबिंड देखणेपण

अंगावर नेहमी उंची आणि शोभतील असेच कपडे
आणि बोलताना जाणवणारं माणूसपण
तरीही ते ‘बरं आहे ना?’ असं म्हणायचे
तेंव्हा काळजाचा ठोका हमखास चुकायचा
सावरेपर्यंत ते पुढे गेलेलेही असायचे

ते श्रीमंत तर होतेच, कदाचित सगळ्यात जास्तं
आणि तरीही नम्रं, मार्दवता जपलेले
थोडक्यात, आम्ही समृद्धीची स्वप्नं पहायचो
ते रावसाहेंबाना डोळयासमोर ठेवूनच

आम्ही जगतच् राहीलो, बदलाची वाट पहात
अर्धपोटी, अर्धनग्नं आणि चरफडत
आणि एका शांत अंधा-या रात्री
रावसाहेबांनी त्यांच्या संपन्नं घरात
स्वतःला सोडवलं आढ्याला टांगत

जयंत विद्वांस
  


 ----------------------------------------------------------------------

Richard Cory by E.A.Robinsom

Whenever Richard Cory went down town,
We people on the pavement looked at him:
He was a gentleman from sole to crown,
Clean favored, and imperially slim.

And he was always quietly arrayed,
And he was always human when he talked;
But still he fluttered pulses when he said,
"Good-morning," and he glittered when he walked.

And he was rich – yes, richer than a king –
And admirably schooled in every grace:
In fine, we thought that he was everything
To make us wish that we were in his place.

So on we worked, and waited for the light,
And went without the meat, and cursed the bread;
And Richard Cory, one calm summer night,
Went home and put a bullet through his head.

E.A.Robinson













No comments:

Post a Comment