Sunday 24 February 2013

वल्लीच सगळ्या.....


वल्लीच सगळ्या.....
(आठ नोव्हेंबर पु.लं.चा जन्मदिन, म्हणून ही आठवण, त्यांच्याच वल्लींच्या मनातली.)

तर काय सांगत होतो मी?
पुरुषोत्तम,
वकीलसाहेबांचे जावई हो 
तेचं मला अजरामर करुन गेले
कुणाला सांगू नका म्हटलं तरी
‘ही गेली, तेंव्हापासून दारचा आंबा मोहरला नाही’
हे सगळ्यांना सांगितलन्
पण माणूस मोठा मिश्किल हो
डोळ्यातून पाणी काढायचा ते सुद्धा अलगद
आता आमच्यात सामील झाले
त्याला सुध्दा बारा वर्ष झाली

थोडं आरोग्यं तरी द्यायचं की रे मी म्हणतो
एवढ्या लोकांचं तोंड हसरं करून गेलं की हो ते
कसलं हो देव बिव घेउन चाललात
नाही नाही ते पापी जगतय की हो मजेत्, म्हणतो मी
मग चांगल्याला का रे त्रास देतो तुमचा देव
माणूस मोठा रसिक हो, सगळयांना वाटायचं फक्तं
आपल्याशीच बोलतय, भाबडं हो येकदम

सगळं आयुष्यं पुराव्यानं शाबित करण्यात गेलं
काहीच जमलं नाही आयुष्यात अशी खंत वाटायची
पण हया पोरानं माझं वेड घराघरात पोचवलं
मला भेटायला आला होता शेवटी
परवा भेटला, म्हणाला , परत एकदा दरबार भरवूयात
ढ बाबू, एक षष्ठांश गोरी यमी सगळे बोलवूयात
आम्ही वयानी मोठे झालो, तो किर्तीनी, गुणांनी
पण जाता जाता परिस लावल्यासारखं आमची 
आयुष्यं सोन्याची करून गेला

-- जयंत विद्वांस



No comments:

Post a Comment