Saturday 23 February 2013

माहित नाही.......


माहित नाही.......

घरातला माणूस गेला का?, माहित नाही 
तुमच्याशी काही नातं होतं का? माहित नाही
खूप काहीतरी हरवल्यासारखं का वाटतय? माहित नाही
शिवराळ भाषा गोड का वाटायची? माहित नाही
काय होतं तुमच्यात असं वेगळं? माहित नाही
डोळ्यातलं पाणी थांबलं का नाही? माहित नाही
तुम्ही आम्हाला उमगलात? माहित नाही

जी माणसं उमगतात, ती मन व्यापत नाहीत
जी माणसं मन व्यापतात, ती उमगत नाहीत 

लाखोंच्या डोळ्यात ओलसर प्रतिमा ठेऊन गेलात
लाखो मराठी माणसांना पोरकं करून गेलात 

--जयंत विद्वांस



No comments:

Post a Comment