Saturday 23 February 2013

अनौरस ....


अनौरस ....

उकिरड्यावर कुणी? का? टाकलं माहित नाही
अर्थात कळून असा काय मोठा फरक पडणार

कुणाच्यातरी क्षणिक सुखाचं दु:खं आहे मी 
कुणाच्या? हा प्रश्न माझ्या बरोबरच जाणार

ती तिची वखवख होती की फसवणूक होती
कारणाचा शोध आता सारं आयुष्य कुरतडणार 

विचारवंतांना पडलेला प्रश्न म्हणजे को अहं
आयुष्यं आता मी विचारवंत म्हणून जगणार

--जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment