Saturday 23 February 2013

काल परवाचीच् तर गोष्टं..


काल परवाचीच् तर गोष्टं..
एवढीश्शी होती झाली तेंव्हा
बाहुली वाटली घेतली तेंव्हा
भरपूर जावळ, मिटलेल्या पापण्या
लालचुटुक जिवणी नी पसरट नाक
मान लपवणारे गुबरे गाल
इटुकले हात आणि पिटुकली बोटं
बाळसेदार कोपरांवर आणि .....

लोभस जीवघेण्या खळ्या
एवढस्सं दप्तर, चेक्सचा रंगीत ड्रेस
फुलपाखराचा डबा नी वॉटरबॅग
काळया रिबिन्सची दोन फुलझाडं
भरलेल्या पापण्या, फुगलेले गाल...

माझ्या कानाला लागते आता
निळी जीन्स, सॅकमधे लॅपटॉप
हातात टचस्क्रीन, कानाला हेडफोन
सतत बिझी, मला भरपूर वेळ....

मोरपंखी शालू, पाचूचा चुडा
अंगभर पिवळी, नाकात हिरा
अंगाखांद्यावर, अंगणात खेळली
काही कळायच्या आत.....
काल परवाचीच् तर गोष्टं..
खरच्, अगदी कालपरवाचीच्.....

--जयंत विद्वांस





No comments:

Post a Comment