Saturday 23 February 2013


काळोखाचे रंग....

तिच्या उबदार मिठीतला
घट्टं चिकटलेला ओलसर
गुलाबी काळोख… 

अध्यात्माच्या गूढ गुहेतला
समईसारखा शांत, सात्विक
भगवा काळोख… 

सावल्यांच्या राक्षसी खेळातला
शहारलेला, अंगावर धावणारा
राखाडी काळोख… 

मनात वासनेत बरबटलेला
नांगी काढणारा, जहरी
हिरवा काळोख…. 

आणि शेवटचा

अज्ञात प्रदेशात ओढून नेणारा
तो विरक्तं, काजळमाखला प्रखर
शुभ्रं काळोख…. 

-- जयंत विद्वांस 

No comments:

Post a Comment