Sunday, 24 February 2013

योगायोग


योगायोग

काय योगायोग आहे पहा
आज परत पौर्णिमा आहे
आज परत ती भेटणार आहे

आकाशातला चंद्र आज
ढगामधे लपणार
तो का लपला, म्हणून
ती इथे रूसणार

आज रूपडं तिचं, चांदण्यात
अजूनच खुलणार
अहो माझच काय, सज्जनांचं
इमान पण ढळणार

आज माझही, नेहमी होतं
तसच होणार
हातात हात घ्यायच्या ऐवजी
चांदण्याची चर्चा होणार

आज तिच्या डोळ्यामधे
एक वेडा हरवणार
पौर्णिमेचा चंद्र, आज
माझ्या ओंजळीत सामावणार

जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment