Sunday 24 February 2013

तुझ्याविना.....

तुझ्याविना.....

तुझ्याविना हे चंद्र चांदणे
काय मला उपयोग आहे
तुझ्याविना हा बहर फुलांचा
पानगळीच्या समान आहे

रुपे तुझी अनंत असती
फेर धरती माझ्या भवती
श्वास तुझा की वास फुलांचा
या इथे दरवळतो आहे

धुंद कामिनी, चपल दामिनी
रेघ ओढते निळ्या गगनी
स्वप्नं सारे वास्तव वाटे
तु माझिया मिठीत आहे

मखमालीवर हया पाचूच्या
रंग सांडला आहे उषेचा
चित्रं सारे सुंदर तरीही
तुझ्या विना ते अपूर्ण आहे

--जयंत विद्वांस 

3 comments:

  1. धुंद कामिनी, चपल दामिनी
    रेघ ओढते निळ्या गगनी
    स्वप्नं सारे वास्तव वाटे
    तु माझिया मिठीत आहे ...!....!!������

    ReplyDelete
  2. धुंद कामिनी, चपल दामिनी
    रेघ ओढते निळ्या गगनी
    स्वप्नं सारे वास्तव वाटे
    तु माझिया मिठीत आहे ...!....!!👌👌

    ReplyDelete