Tuesday 19 February 2013

अवेळ....

अंगी होती ताकद जेंव्हा
शय्येवरी मजे पहुडलो 
रात्री जागून दिवसा निद्रा
दिवास्वप्नी खूप रमलो

दिली चोच, तो देईल चारा
वचन पाठ, सदा सुस्तावलो
नशिबच नाही आमचे साले
रोज म्हणत पक्का निर्ढावलो

इतरांची पाहून प्रगती
न थोडासाही खट्टू झालो
चेहऱ्याच्या सौंदर्यावरती
मनापासून लट्टू झालो

वार्धक्याची आराम खुर्ची
तारुण्यातच घेऊन झाली
उतारवयी संसार करतो
विषयाची न तृप्ती झाली

वेळ होता भरपूर जेंव्हा
किंमत तेंव्हा नाही कळली
आता वेळ थोडा, सोंगे फार
प्रत्येक वेळ अवेळ झाली

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment