Wednesday 27 February 2013

थवा.....


थवा.....


कलत्या उन्हात पाखरांचा थवा
मनाच्या आभाळावर मुक्तंपणे
रेघ ओढून जावा, तसा
तुझ्या आठवणींचा थवा, माझ्या
मनात गुंता करतोय भर दुपारी

चिवच्रिवाटातला नाद आणि तुझा
उष्णं श्वास, यातला फरक हल्ली
कळेनासा झालाय मला
पहिला आनंदानं नाचतोय,
दुसरा उसासे टाकतोय

लहानपणचा मित्रं रस्त्यात दिसावा
पण नाव संदर्भ आठवू नयेत
किती वाईट वाटतं तेंव्हा
तुझं नावच् काय पण सारे
संदर्भही आठवतायेत निःसंदिग्धं

तुझं रेखीवपण् हळूच् काजळ घालण्याइतकं
कृती कृतीतला उत्साह आणि
त्यातही ओथंबणारं आखलेपण
ढोबळमानानी सांगायचं तर
रेखीवपण रेखाटतय् त्या थव्यासारखं.....

--जयंत विद्वांस



No comments:

Post a Comment