Saturday 23 February 2013

मित्रा .....


मित्रा .....

लोकांनी का? असं विचारायला हवं
केंव्हा? असं विचारायला सुरवात झाली आता
फार यातना होतात रे

उंचीनं लहान असलास तरी कर्तृत्वाने आभाळच् तू
तुझा वैयक्तिक आदर्श ठेवावा इतका गुणी
तुझ्यापुढे सगळे विक्रम, मानसन्मान, मरातब
हात जोडून उभे राहिलेले आम्ही पाहिलेत

खरंतर तू आम्हांला आत्तापर्यंत खूप आनंद दिलास
त्याचं कर्ज नं फिटणारं पण.....
आयुष्याला सुद्धा मरणाचा शाप आहे,
कुठेतरी थांबावं लागतच् ना?, नको वाटलं तरी...

तुझ्या शिखरावरच्या अनंत प्रतिमा डोळ्यात आहेत
त्या तश्याच् राहू देत रे
तू वेगळा आहेस पण मानव आहेस
तू सुज्ञं आहेस त्यामुळे इथेच् थांबतो

--जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment