Wednesday 27 February 2013

धुकं......

(Click the image)

दोस्तं......



दोस्तं......

रात्रीचा स्मशानातून जात होतो
कुणीतरी हाक मारली
चार पाच जण असतील
गप्पा मारत होते

ती सगळी माणसं होती?
नाही सांगू शकत्.
देवदूत असतील, मला
बोलावत होते जवळ

एक म्हणाला, मित्रां ये
गप्पा मारूयात यार
ऐकण्या बोलण्यात रात्रं
अश्शी निघून जाईल

मी सांगत होतो, रात्रं जात होती
माझं सांगणं संपलं आणि रात्रंही
एकजण जवळपास ओरडूनच् म्हणाला
अरे, हा तर आपल्यात सामील झाला

मी पहिल्यांदाच हसून्‍ म्हणालो, कधीच्,
कदाचित चांगले मित्रं शोधत होतो
बरं झालं, तुम्ही मला ओळखलत् ते
नाहीतर जग उगाच् मला जीवंत शाबित करायचं
  
--जयंत विद्वांस

शेतकरीदादा...




शेतकरीदादा...

काळी आई देईल पटीनं,
तुझ्या घामाचं पाणी तिला मिळू दे
ढवळ्या पवळ्याची जोडी
तिच्या अंगाखांद्यावर खेळू दे

एका बीजाचं हजार दाणं
धरती देईल सोनंनाणं
भाताची ओंबी, गव्हाची लोंबी
तिच्या मस्तकी झूलू दे

पाटाचं पाणी झुळझुळ वाहे
मानेचं घूंगूर खुळ्खुळ वाजे
गो॑फण फिरवीत नकोस बसू
पक्ष्यांना गाणं गाउ दे

गर्भ धरतीचा फुलून येईल
जनता सारी आबाद होईल
कांदा भाकरी भुकेल्या पोटी
त्याची अमृतगोडी चाखू दे

--जयंत विद्वांस



सुटेल का तुज कोडे?

(Click the image)

नाही कळले.....


नाही कळले.....

असे घोर पाप काय केले
आम्हांलाही नाही कळले
शिक्षा किती कठोर द्यावी
त्यांना नाही उमजले... 

रोज मरण दिधले आम्हां
रोज आम्हांला जाळीले
का इतुके जगलो आम्ही
जळलो तरी नाही कळले...

त्यांनी सारे ओढून नेले
तरी मौन ना सोडले
उघडपणे मारत होते
तरी घाव आम्ही झाकले...

बघे षंढ दूर उभे ते
जे सभ्यंपणे पळाले
श्रद्धांजली वाहण्यासाठी
विना अश्रू मूक रडले...

--जयंत विद्वांस






अंगठा नाही दाखवणार.........


अंगठा नाही दाखवणार.........

अंधा-या रात्री काटयाकुटयातून चालताना
जेंव्हा आपलीच सावली करते
सतत भुतासारखा पाठलाग
बोचत् असतात मनाला अपमान आणि सल
पायाला बोचणा-या खड्यासारखे
येईल कुणाची तरी हाक म्हणून
आशाळभूत झालेलं मन

आठवतं आपल्या हाकेची वाट पहात, असच्
या भरल्या अंगारातून पुढे गेलेलं एक पाउल
द्विधा मनःस्थितीत एक मदतीचा हात येतो
सारासार विचार न करता मदत घेशील   
हाताच्या टोकाला असेल धूर्त संधीसाधू

हाताच्या टोकाला असेन मी तर प्रश्नंच् नाही
नसेन मी, तर आठव ते सोनेरी पाउल
अहंकाराचं कवच गळून पडलं असेल तर हाक दे

गुं॑फला जरी असेल माझा हात एखाद्या हातात
करंगळी का होईना मोकळी ठेवीन तुझ्यासाठी
अंगठा नाही दाखवणार.........

-- जयंत विद्वांस

रूपडं.....

(Click the image)

थवा.....


थवा.....


कलत्या उन्हात पाखरांचा थवा
मनाच्या आभाळावर मुक्तंपणे
रेघ ओढून जावा, तसा
तुझ्या आठवणींचा थवा, माझ्या
मनात गुंता करतोय भर दुपारी

चिवच्रिवाटातला नाद आणि तुझा
उष्णं श्वास, यातला फरक हल्ली
कळेनासा झालाय मला
पहिला आनंदानं नाचतोय,
दुसरा उसासे टाकतोय

लहानपणचा मित्रं रस्त्यात दिसावा
पण नाव संदर्भ आठवू नयेत
किती वाईट वाटतं तेंव्हा
तुझं नावच् काय पण सारे
संदर्भही आठवतायेत निःसंदिग्धं

तुझं रेखीवपण् हळूच् काजळ घालण्याइतकं
कृती कृतीतला उत्साह आणि
त्यातही ओथंबणारं आखलेपण
ढोबळमानानी सांगायचं तर
रेखीवपण रेखाटतय् त्या थव्यासारखं.....

--जयंत विद्वांस



Monday 25 February 2013

नाही…

(Click the image)

एक होता कावळा…


हुकुम



लहानांना क्षुल्लक गोष्टीत सुद्धा मजा आहे. प्राणी बोलतात हे त्यांना आश्चर्य असतं. सशाची फजिती त्यांना हसवते तर सिंहाची डरकाळी घाबरवते आणि तेंव्हाच त्यांच्या मनात रुजतं, डरकाळी फोडतो तो राजा आणि बाकी सारी प्रजा. जगात कित्येक नियम प्राण्यांचेच आहेत. गाढवं नको ती कामं करतात, धूर्त कोल्हे कायम सत्ताधीशांच्या मागे असतात. गरीब जमतात आणि पळत सुटतात. फक्तं पळताना ते एकत्रं असतात.

एकदा एका जंगलात भरली होती सभा
सिंहाच्या खुर्चीमागी कोल्हा होता उभा

उंट आणि जिराफानं धरलं होतं तोरण
वाघोबाने धरलं होतं शांततेचं धोरण
माकड आलं हत्ती आला, आलं हरीण ससा
कावळा म्हणाला, आता सगळे खाली बसा

गाढवाने  स्वागत केलं, कोल्हयाने भाषण दिलं
जुना राजा नको आता, निवडीचं मागणं केलं
सिंहाला मग राग आला, आवाज त्याचा मोठा झाला
बंड तुमचं मोडून टाकतो, खाउन टाकतो मिळेल त्याला

हरीण माकड गाढव ससा, सुसाट सुटले पळत
कोल्हा म्हणतो लांडग्याला, कशी आली गंमत
सिंहानी मग हुकुम काढला, सर्वांचा मी राजा आहे
बंड झालं पुन्हा तर फाशीची सजा आहे