Wednesday 27 February 2013

अंगठा नाही दाखवणार.........


अंगठा नाही दाखवणार.........

अंधा-या रात्री काटयाकुटयातून चालताना
जेंव्हा आपलीच सावली करते
सतत भुतासारखा पाठलाग
बोचत् असतात मनाला अपमान आणि सल
पायाला बोचणा-या खड्यासारखे
येईल कुणाची तरी हाक म्हणून
आशाळभूत झालेलं मन

आठवतं आपल्या हाकेची वाट पहात, असच्
या भरल्या अंगारातून पुढे गेलेलं एक पाउल
द्विधा मनःस्थितीत एक मदतीचा हात येतो
सारासार विचार न करता मदत घेशील   
हाताच्या टोकाला असेल धूर्त संधीसाधू

हाताच्या टोकाला असेन मी तर प्रश्नंच् नाही
नसेन मी, तर आठव ते सोनेरी पाउल
अहंकाराचं कवच गळून पडलं असेल तर हाक दे

गुं॑फला जरी असेल माझा हात एखाद्या हातात
करंगळी का होईना मोकळी ठेवीन तुझ्यासाठी
अंगठा नाही दाखवणार.........

-- जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment