Saturday 23 February 2013

प्रश्न....


प्रश्न....

उत्तर नाही, ते
प्रश्न पडतात
निरुत्तर व्हावं
असे असतात?

मरत नाहीत
ते का जगतात?
मरायच्या आधी
स्मशानी नेतात?

सत्याचे प्रयोग
कधी जमतात?
असत्याचं यश
झळकवतात?

नको तेंव्हा स्पर्श 
का आठवतात?
दडलेले झरे
का उफाळतात?

--जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment