Wednesday 27 February 2013

शेतकरीदादा...




शेतकरीदादा...

काळी आई देईल पटीनं,
तुझ्या घामाचं पाणी तिला मिळू दे
ढवळ्या पवळ्याची जोडी
तिच्या अंगाखांद्यावर खेळू दे

एका बीजाचं हजार दाणं
धरती देईल सोनंनाणं
भाताची ओंबी, गव्हाची लोंबी
तिच्या मस्तकी झूलू दे

पाटाचं पाणी झुळझुळ वाहे
मानेचं घूंगूर खुळ्खुळ वाजे
गो॑फण फिरवीत नकोस बसू
पक्ष्यांना गाणं गाउ दे

गर्भ धरतीचा फुलून येईल
जनता सारी आबाद होईल
कांदा भाकरी भुकेल्या पोटी
त्याची अमृतगोडी चाखू दे

--जयंत विद्वांस



No comments:

Post a Comment