Saturday 23 February 2013

हल्ली.....


हल्ली.....

वास्तव स्वप्नात बदलून पहायचय्
पण स्वप्नं पडतच् नाही हल्ली

बाटली घोटात रिचवून पहायचीय्
पण नशा चढतच् नाही हल्ली

तुटल्या नात्यांना जुळवून पहायचय्
पण नातं जुळतच् नाही हल्ली

गुंतल्या मनाला सोडवून पहायचय्
पण मन गुंततच् नाही हल्ली

थांबल्या अश्रूंना वाहवून पहायचय्
पण सल रडतच् नाही हल्ली

हरल्या डावांना जिंकवून पहायचय्
पण कुणी खेळतच् नाही हल्ली

--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment