Saturday, 23 February 2013

काय करूयात यांचं?.....



काय करूयात यांचं?.....

वाचताना पण अंगावर शहारा येतो
जिनी भोगलंय तिची काय अवस्था असेल?
जगली तरी, तिच्या जगण्याला अर्थ असेल?
कोमात गेली तर यातना तरी नाहीत,
म्हणजे जाणवणार तरी नाहीत निदान!

पण त्या पशूंचं काय करायचं?
उगाच ७-८ वर्ष केस चालणार
साक्षीदार नाहीत म्हणून संशयाचा फायदा
मग ते निर्दोष सुद्धा सुटू शकतात
तो पर्यंत कोण एवढ लक्षात ठेवणार?

खरं तर पशू म्हटल्यावर जंगलचा कायदाच हवा
पण त्यांना फाशी देऊ नका, झटक्यात सुटतील मग ते 
काय करूयात यांचं?
नपुंसक किंवा अपंग हेच दोन मार्ग योग्यं
पण अपंग नकोच,
अपंग म्हणून सवलत, नोकरी सुद्धा मिळेल त्यांना 
नपुंसक करणे उत्तम, पण नाही समाधान होत त्यानी पण 

मग नक्की काय करूयात यांचं?....

--जयंत विद्वांस


No comments:

Post a Comment