Monday 25 February 2013

हुकुम



लहानांना क्षुल्लक गोष्टीत सुद्धा मजा आहे. प्राणी बोलतात हे त्यांना आश्चर्य असतं. सशाची फजिती त्यांना हसवते तर सिंहाची डरकाळी घाबरवते आणि तेंव्हाच त्यांच्या मनात रुजतं, डरकाळी फोडतो तो राजा आणि बाकी सारी प्रजा. जगात कित्येक नियम प्राण्यांचेच आहेत. गाढवं नको ती कामं करतात, धूर्त कोल्हे कायम सत्ताधीशांच्या मागे असतात. गरीब जमतात आणि पळत सुटतात. फक्तं पळताना ते एकत्रं असतात.

एकदा एका जंगलात भरली होती सभा
सिंहाच्या खुर्चीमागी कोल्हा होता उभा

उंट आणि जिराफानं धरलं होतं तोरण
वाघोबाने धरलं होतं शांततेचं धोरण
माकड आलं हत्ती आला, आलं हरीण ससा
कावळा म्हणाला, आता सगळे खाली बसा

गाढवाने  स्वागत केलं, कोल्हयाने भाषण दिलं
जुना राजा नको आता, निवडीचं मागणं केलं
सिंहाला मग राग आला, आवाज त्याचा मोठा झाला
बंड तुमचं मोडून टाकतो, खाउन टाकतो मिळेल त्याला

हरीण माकड गाढव ससा, सुसाट सुटले पळत
कोल्हा म्हणतो लांडग्याला, कशी आली गंमत
सिंहानी मग हुकुम काढला, सर्वांचा मी राजा आहे
बंड झालं पुन्हा तर फाशीची सजा आहे






No comments:

Post a Comment