Wednesday 6 March 2013

कालपर्यंत.....




कालपर्यंत.....

कालपर्यंत जे दुश्मन होते,
तेच् आज घट्टं मित्रं आहेत
सज्जनांच्या वस्तीतच्
आज गुत्ते जास्तं आहेत!!!

कालपर्यंत या वाटेवर
जे फिरकतही नव्ह्ते
आज गर्दीत त्यांचीच
डोकी जास्तं आहेत!!!

कालपर्यंत या जागेवर
भेटणं निव्वळ अशक्यं
आज इथेच भेटण्याचे
त्यांचे ठाम इरादे आहेत!!!

कालपर्यंत या दारावर
जे थांबतही नव्हते
आता इथेच घरोबा
करण्याचे वायदे आहेत!!!

--जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment