Monday, 29 September 2014

पुन्हा पुन्हा......

पुन्हा पुन्हा...... 

थरथरे हात माझा
हात सोडताना तुझा
अडखळे श्वास माझा
आठवांनी तुझ्या पुन्हा

दाटलेले हुंदक्यांनी
कोंडलेला प्राण आहे
जळतो, तरी नंतर
नशिबी सरण पुन्हा


सांगताना गोष्टं माझी
तुझ्या समीप थांबते
पूर्ण ती होणार नाही
राहते अपुरी पुन्हा

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment