Monday, 29 September 2014

पुन्हा......

पुन्हा......
 
संपले क्षण सुखाचे
शल्यं झाली ताजी पुन्हा

खंगलेले भाग्यं अन्
उद्या जगायचे पुन्हा

अंधार माझा सोबती
उजेडी एकटी पुन्हा

शिवते एकेक टाका
उसवतो जरी पुन्हा

जटायूचा आव माझा
एकांती चिमणी पुन्हा

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment