Thursday 3 October 2013

प्रिय ‘ती’स् .....


किती वर्षांनी दिसलीस? जवळजवळ १९-२० वर्षांनी. जग फार छोटं आहे म्हणतात तरीही एकाच शहरात एवढा काळ लागला नुसतं दिसायला, समोरासमोर येणं अजून लांबच आहे. 

काळाचा फार परिणाम तुझ्यावर झाला नाही, याचं कौतुक वाटलं. सगळेच् देखणे चेहरे वाढत्या वयात तसेच रहात नाहीत. काहीवेळेस जुने चेहरे आठवणीतून पुसून टाकावेत इतके बदलतात. तू फेसबुकावर आहेस की नाहीस माहित नाही. तुझ्यावर ती-1 ते 15 अशा तब्बल पंधरा कविता झाल्यात… इतर सौंदर्यकवितांचं  प्रेरणास्त्रोत पण तूच तर आहेस त्यामुळे फक्त १५ नाहीत. त्याची रॉयल्टी काय देउ??? 

मनात असूनही हाक मारू शकलो नाही कारण आपण परत न भेटणच इष्टं असं मला वाटलं. काही जपलेल्या गोष्टी असतात त्या तशाच राहिलेल्या ब-या, नाही का? अज्ञानात सुख असतं असं म्हणतात, जबाबदा-या, संसार, मुलं, समाज या सगळ्या जंजाळातून त्या पूर्वीच्या भावना उरतीलच असं नाही. असतील उरल्या तरी दर्शविता येतीलच असंही नाही. सगळीच कुचंबणा आणि बंधनं. त्यामूळे जे जपलय तेच छान आहे असा विचार केला.



असेल योग तर भेटूच आपण आज ना उद्या. दोघांकडेही सांगण्या ऐकण्यासारखं खूप असेल, फक्तं काळ तेवढा शिल्लक असला म्हणजे झालं.

(कुठल्याही मृत अथवा जिवंत, एक किंवा अनेक व्यक्तिशी संबंध आढळल्यास तो योगायोग समजू नये.)
......

जयंत विद्वांस

1 comment:

  1. किती तरी गोष्टी सांगायच्या,राहून च गेल्या की
    तुजे डोळे, ते प्रेमाने मला बघण्या साठी केलेली
    धड़पड,माज़ा पावसात भिजतना धरलेला घट्ट हात
    गाड़ी वर उडालेले माज़े केस,तुजी उडालेली धंदल
    सर्व सर्व काही माज्या स्मृति च्याजोलीत जपुन आहे ..!!

    ReplyDelete