Saturday 6 April 2013

विषय.....

विषय.....

'विषयाच्या' विषयाला
आपल्याकडे बंदी आहे
तसं पाहायला गेलं तर
प्रत्येकजण छंदी आहे

विषय भावना होणारच
मन मर्यादेत आनंदी आहे
विषय वासना होणारच
मन अमर्याद स्वच्छंदी आहे

विषयाची तृप्ती अर्धी म्हणून
त्या 'बाजारा'त ना मंदी आहे
विषय सांडतो डोळ्यातून
पण चर्चा मात्रं गंदी आहे

जयंत विद्वांस

No comments:

Post a Comment